shetkar aandolan27.jpg
shetkar aandolan27.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टोत याचिका...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन निवृत्त न्यायमूर्तीच्या आयोगामार्फेत चैाकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

दोन महिन्यांच्या शांततापूर्ण आंदोलनानंतर काल दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅलीदरम्यान झालेल्या प्रकरणात पोलिसांनी बावीस गुन्हे दाखल केले आहेत. काल झालेल्या आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अनेक शेतकरी नेत्यांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच आणि स्पेशल सेलकडून करण्यात येणार आहे.

दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकला. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. 

या मोर्चाला दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसले. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांवरच हल्ला करत त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. यादरम्यान काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात पोहचले.

या मोर्चाला दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसले. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांवरच हल्ला करत त्यांच्या गाड्यांच्या तोडफोड केल्याच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात पोहचले.
Edited  by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT